स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं जीवावर बेतलं ; तरुणाचा जागीच मृत्यू

मालवण वायरी येथील दुर्घटना : आकस्मिक मृत्यूची नोंद

छोट्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणं एका पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना मालवण वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. श्रेणीक मिलींद टाकळे कागल, कोल्हापूर असं या तरुणाचं नाव आहे. स्विमींग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोकीला गंभीर दुखापत झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कागल येथील दहा मित्राचा एक गृप पर्यटनासाठी मालवणमध्ये आला होता. काही मित्र स्विमींगचा आनंद लुटत होते. छोट्या स्विमींगपूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीक याने आठ ते दहा फुटावरून उडी घेतली. त्याची उंची कमी असल्याने त्याची उडी बेट पुलाच्या तळाशी जावून त्याचे डोके आपटले. यात डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहकारी मित्रांनी तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

error: Content is protected !!