खत भेसळ प्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. राजीव बिले यांचा युक्तिवाद

रासायनिक खतामध्ये भेसळ केल्याच्या व भेसळयुक्त खत विक्रीस ठेवल्याच्या आरोपातून वर्धमान फर्टीलायझर्स अँड सीड्स प्राइवेट लिमिटेड. वाकड वाडी, पुणे. या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर राजेश स्वामी तसेच कुडाळ येथील मळगावकर कृषी मित्र फर्टीलायझर विक्री केंद्राचे मालक विवेकानंद सदाशिव मळगावकर यांची मे मुख्य न्यायदाधिकारी सिंधुदुर्ग ओरस, श्री आर व्ही नडदगल्ली यांनी निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी वर्धमान फर्टीलायझर्स तर्फे ऍड राजेंद्र रावराणे तर विवेकानंद मळगावकर यांचे तर्फे ऍड राजीव बिले यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कार्यालयातील खतनिरीक्षक श्री प्रवीण ओहोळ यांनी कुडाळ येथील खतविक्रेते मळगावकर कृषी मित्र तर्फे मालक विवेकानंद मळगावकर यांच्या मालकीच्या खत विक्री केंद्रास दिनांक 13 जून विषय 12 रोजी तपासणी करिता भेट दिली होती व त्यांनी विक्रीस ठेवलेल्या खताचा नमुना तपासणीकरिता जप्त केला होता.सदर जप्त केलेले खताचे नमुने त्यांनी रासायनिक तपासणी करिता राज्य प्रयोगशाळा पुणे यांचेकडे पाठविले असता ते अप्रमणित असल्याचा रिपोर्ट त्यांना प्राप्त झाला. तदनंतर खत निरीक्षक श्री प्रवीण ओहळ यांनी फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर आणि इसेन्शियल कमोडिटीज अॅक्ट या कायद्या मधील तरतुदीनुसार कार्यपद्धती वापरून अ प्रमाणित खत उत्पादित केले व ते विक्रीस ठेवले या आरोपाखाली आरोपींविरुद्ध फिर्याद मे मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 च्या कलम 3 सह 7 व इसेन्शिअल कमोडिटीज अॅक्ट 1955 चे कलम 12 13 (2 )व 19 अन्वये दोषारोप ठेवण्यात आलेला होता. सदर केसची सुनावणी मे प्रमुख अधिकारी न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग श्री आर व्ही नडदगल्ली यांच्यासमोर पूर्ण झाली. पुराव्या अंती आरोपी तर्फे मांडण्यात आलेला बचाव ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

error: Content is protected !!