कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविला

समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार

समिल जळवी यांचा दोन वर्षे सुरू होता पाठपुरावा

कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागातील ग्रीन झोन आमदार निलेश राणे यांनी ऊठविल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार समिल जळवी यांनी आभार मानले आहेत.
गेली कित्तेक वर्षे कुडाळ शहरातील कविलकाटे नगरपंच्यायत हद्दीतील कविलकाटे १ नंबर वॉर्ड मधील शेतकरी आणि नागरीकांची प्रमुख्याने आग्रहाची अशी मागणी असलेला ग्रीन झोन हा उठवावा अशी मागणी होती. यासाठी सामाजिक सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार समिल जळवी यांनी गेली दोन वर्षे या ग्रीन झोन उठावा यासाठी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना भेटून लेखी निवेदने देऊन पाठपुरावा केला होता, मात्र यश आलं नव्हत. त्यानंतर कुडाळ-मालवण चे आमदार निलेश राणे हे आमदार झाल्यानंतर त्यांना तीन वेळा वेगवेगळ्या स्वरूपाची लेखी निवेदने देऊन आणि आणि गेल्या वर्षभरात आमदार निलेश राणे यांना सातत्याने भेटून वेळोवेळी ग्रीन झोन उठवण्यासाठी मागणी समिल जळवी यांनी केली होती आणि त्याचा पाठपुरावा देखील केला होता. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी कविलकाटे येथिल ग्रीन झोन संदर्भात आवाज उठवून बातम्या प्रसिद्धीस आणून शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते.
या सर्वच गोष्टींची दखल घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कविलकाटे भागातील बराचसा ग्रीन झोन उठला आहे. हा ग्रीन झोन उठल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जास्तीत जास्त प्रमाणात ग्रीनझोन उठवून सहकार्य केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले. उर्वरित राहिलेल्या काही भागातील जमिनीवरील ग्रीन झोन उठवण्याची हमी त्यांनी दिली. त्यासाठी नागरिकांच्या माध्यमातून ज्यांच्या भागात ग्रीन झोन किंवा बाधित झोन आहे त्यांनी 8 जुलै पूर्वी हरकती घेऊन त्याचे नगरपंचायत कार्यालयात हरकती घेण्यासाठी अर्ज सादर करा, मग राहिलेल्या भागातील त्रुटी काढून देऊ असे देखील आमदार निलेश राणे यांनी सांगितले. या भागातील ग्रीन झोन ऊठविल्यामुळे कविलकाटे भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!