आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये दहावी बारावी गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न.

कणकवली/प्रतिनिधी

फक्त दहावी बारावीचे गुण भविष्यात आपल्याला उपयोगी ठरणार नाही तर आपल्याला जर भविष्यात प्रगतीचं उंच शिखर गाठायचं असेल तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं असेल तर अधिक प्रयत्न करणं, चिकाटीने अभ्यास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास चे सहाय्यक आयुक्त श्री भैय्यासाहेब येरमे साहेबांनी व्यक्त केले. या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते त्यांच्याबरोबर जिल्हा कौशल्य विकास चे श्री तडवी सर आणि श्री निखिल दवणे सर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला त्यानंतर इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही इयत्तांमधील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
गेली पंधरा वर्ष ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे या प्रशालेन दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे प्रशाला केवळ परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी घडवत नाही तर देशाचे उद्याचे सुजाण नागरिक घडवते असे प्रतिपादन ज्ञानदा शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचप्रमाणे पालक वर्ग मधून सुद्धा आपलं मनोगत पालकांनी व्यक्त करत शाळा संस्था आणि शिक्षक वर्गांबद्दलही गौरव उदगार काढले.
इयत्ता दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीतील पहिल्या तीन गुणवंतांना कै. श्रीधर वासुदेव बडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी पारितोषिक बडे कुटुंबीयांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली होती,ही पारितोषिके सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री भैय्यासाहेब येरमे सर, श्री तडवी सर,श्री दवणे सर, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे सर, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सल्लागार श्री डी.पी तानवडे सर, संस्था सदस्य श्री बडे सर, बडे मॅडम, आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,इंग्लिश स्कूलचे को ऑर्डिनेटर निलेश घेवारी सर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला इयत्ता दहावी आणि बारावी या दोन्ही इयत्तांमधील उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयडियल इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री हेमंत पाटकर सर यांनी केले तर आभार शिक्षण संस्थेचे सल्लागार श्री डी.पी तानावडे सर यांनी मानले.

error: Content is protected !!