प्रसिद्ध मालवणी कवी तथा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयचे प्र.प्राचार्य कवी डॉ. नामदेव गवळी सर यांचे निधन

प्रसिद्ध मालवणी कवी तथा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रज्ञावंत, विद्यार्थिप्रिय, मृदू स्वभावाचे प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी सरांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून डॉ. गवळी सर सक्रियपणे कार्यरत होते. कॉलेजच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांच्या मालवणी बोली काव्याला, विशेषतः भातालय या काव्यसंग्रहाला नामांकित संस्थानी गौरविले होते.
गेली काही वर्ष कॉलेजचे उप प्राचार्य, प्रभारी प्राचार्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळ्ल्या होत्या.
डॉ. गवळी सरांच्या रूपाने एक आदरणीय विद्यार्थिप्रिय, संयमशील व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे.





