सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निकिता एडवे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशनमध्ये बजावली आहे सेवा
निकिता एडवे यांचे सर्व स्तरातून होते अभिनंदन
महिला अत्याचार निवारण कक्षामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या निकिता बाळकृष्ण एडवे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी याबाबतचे आदेश दिले असून, निकिता येडवे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशन मध्ये यशस्वीरित्या सेवा बजावली आहे. कणकवली तालुक्यामध्ये त्यांनी बजावलेली सेवा ही लोकाभिमुख म्हणून आजही ओळखली जाते. त्यांच्या या बढती बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची पदे पोलीस उपनिरीक्षक संवर्गामध्ये वर्ग करण्यात आली असून त्यांना पोलीस उपनिरीक्षक संबोधन्या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता पोलीस दलात 30 वर्षे सेवा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर किमान 3 वर्षे सेवा असे निकष देण्यात आले होते. या अंतर्गत निकिता एडवे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. निकीता येडवे या सध्या महीला अत्याचार निवारण कक्ष ओरोस सिंधुदुर्ग येथे कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी कणकवली ,बांदा, वैभववाडी ओरोस, पोलीस मुख्यालय या ठिकाणी उत्कृष्ट रित्या सेवा बजावली आहे.





