महावितरण करिता मंजूर झालेल्या डी पी डी सी च्या निधीतील कामे तात्काळ मार्गी लावा!

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

कार्यकारीअभियंता बाळासाहेब मोहितेंकडून कामे लवकर मार्गी लावण्याची ग्वाही

राज्य शासनाकडून आलेल्या निधी अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वितरण च्या प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात ट्रांसफार्मर बसवण्याच्या कामापासून अन्य अनेक कामांचा समावेश आहे. कणकवली विभागातील अनेक कामे मंजूर असून या मंजूर कामांना तातडीने गती द्या व ही कामे मार्गी लावा अशी मागणी शिवसेना पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे करण्यात आली. पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीज वितरणच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीही कामे मार्गी लागली पाहिजेत. तशी मागणी तालुकाप्रमुख श्री. परुळेकर यांनी केली. त्यावर श्री. मोहिते यांनी याबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्यात येईल व लवकरात लवकर कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत, शेखर राणे, दामू सावंत, बाबू आचरेकर, राजन म्हाडगुत, दीपक दळवी, मारुती सावंत, दीपक राऊत, भास्कर हडकर, यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!