मधली कुंभारवाडी-कुडाळ येथे उद्या श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव

कुडाळ ; श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव उद्या, १८ एप्रिल २०२३ रोजी मधली कुंभारवाडी-कुडाळ येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता श्री संत गोरा कुंभार यांचा पुण्यतिथी आणि दीपप्रज्वलन कार्यक्रम, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री देव ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ मधली कुंभारवाडी यांचे भजन तर सायंकाळी ४ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ दाभोली-वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक ‘शेषात्मज गणेश’ सादर होईल. तर रात्री ८ वाजता तिरंगी बारी भजनाचा जंगी सामना बुवा संदीप लोके, बुवा गुंडू सावंत आणि बुवा विनोद चव्हाण यांच्यात स्थळ श्री देव ब्राह्मण मंदिर, मधली कुंभारवाडी, कुडाळ येथे होईल. या उत्सवाचा सर्व भक्तगणांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!