सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छते विषयी काम करणारे पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सहा महिने पगाराविना

पगाराशिवाय काम कसे करायचे कर्मचाऱ्यांचा सवाल
सातत्याने मागणी करून देखील शासनाचा दुर्लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छतेच्या विषयी काम करणाऱ्या बीआरसी च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 6 महिने पगारच मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर गेले सहा महिने उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत राज्य स्तरावर मागणी केली. वारवर पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सर्व कर्मचाऱ्यांनी जगायचं तरी कसं? असा सवाल या कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनाचे सर्व उपक्रम राबविण्यात बिआरसी जीव ओतून काम करतात. पण शासन या कंत्राटी कर्मचारी यांना उपासमारीने मारायचा विचार करीत आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
13 वर्ष काम करूनही शासन योजना राबविण्यास प्राधान्य देत आहे पण योजना राबविण्यासाठी राबणारा कर्मचारी उपाशी मेला तरी शासनाला काहीच फरक पडत नाहीं असा आरोप या कर्मचाऱ्या मार्फत केला जात आहे. एकीकडे 6 -6 महीने पगार नाही. दुसरीकडे 3 व 6 महिने अशी पुनर्नियुक्ती देऊन कर्मचाऱ्यांची थट्टाच मांडली आहे. वय निघून गेलेले कर्मचारी आता कुठे नवीन काम शोधणार. शासन या कर्मचाऱ्यांना नवीन काम देणार का? फक्त एकच प्रश्न भेडसावतो तो म्हणजे घर कुटुंब कसं चालवायचं? मुलाच शिक्षण, घरातील आजारपण बँकेचा हप्ता, आणि नियमितच्या गरजा कशा भागवायच्या? शासनाकडे याच उत्तर नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जगायचं तरी कसं? असा सवाल या कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.





