पेट्रोलबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका;

केंद्र सरकारकडे पुरेसा इंधन साठा — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या चर्चांना उधाण आले असताना मुख्यमंत्री यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अचानक तुटवड्याची भीती निर्माण झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे पुरवठा व्यवस्थेवर तात्पुरता ताण निर्माण होतो. मात्र, याचा अर्थ इंधन साठा कमी झाला असा होत नाही, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर किंवा चर्चांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून इंधन पुरवठा सुरळीत राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!