कणकवली टेंबवाडी येथे नाले सफाई मोहिमेला सुरुवात

रीना रविकांत जोगळे यांचा पुढाकार
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने सौ. रिना रविकांत जोगळे यांच्या पुढाकारातून टेंबवाडी येथे नाले सफाई मोहिम राबविण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साचलेला गाळ व झाडाझुडपांची साफसफाई जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
या वेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते. परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारची कामे सातत्याने सुरू राहतील, असे सौ. रिना रविकांत जोगळे यांनी सांगितले. नागरिकांनी देखील या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले.





