वालावल-चेंदवण-कवठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

सा. बा. अधीक्षक अभियंता यांचा रस्ता दुरुस्तीचा शब्द

रस्त्याची दुर्दशा झाल्याने वालावल ते चेंदवण-कवठी गावातील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून रस्ता रोको केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्री. शिंदे याना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिकाऱ्यानी मोटार सायकलवर बसून हा रस्त्यावरून प्रवास करून दाखवा अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर जि प सदस्य रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी पुढाकार घेत सा. बा. चे अधिक्षक अभियंता दीनेश बगुल यांच्या कडुन संपूर्ण रस्ता कार्पेट मारुन घेण्याचा शब्द घेतला असता ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. पं. स. सदस्य अर्चना बंगे, जि. प. सदस्य रुपेश पावसकर, माजी पं. स. सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वालावल ते चेंदवण कवठी रस्ता पूर्णतः चाळण झाला असुन यासंदर्भात मंगळवार १२ रोजी वालावल सकाळी ९ वाजता आंदोलनाचा इशारा दिला होता. सकाळ पासुन वालावल पोस्ट कार्यालयासमोर कवठी, चेंदवण वालावल, नेरुर, हुमरमळा येथुन आंदोलनकर्ते ग्रामस्थ जमु लागले. निवती पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड यांनी पोलीस कुमक वाढवत आंदोलनकर्त्यांना शांततेत सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची सुचना दिल्या.
दरम्यान ग्रामस्थांनी सा. बा. च्या अधिकाऱ्यांना मोटार सायकल वर बसून फिरण्याचे आवाहन केले. रस्त्याची झालेली चाळण बघा आमच्या मोटार सायकल वरुन तुम्ही प्रवास करा. तुम्हाला एसीत बसुन काय वाटत नाही. या रस्त्यावरून आमची मुले कामावरुन येतात. त्यामुळे अपघात होऊन आमच्या लोकांना आम्ही मुकणार ही मनामध्ये आमच्या भिती आहे. तुम्ही हा रस्ता कधी करणार असा, प्रश्नांचा भडिमार करत तुम्ही आमच्या मोटारसायकल वर पाठीमागे बसाच असा आग्रह धरला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी सा. बा. चे शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत संपूर्ण रस्त्याची खडी उखडली आणि तुम्ही खड्डे बुजवून थुकपट्टी लावुन ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहात काय? आमची मुले शाळेत जातात, तरुण आमचे नोकरी निमित्ताने कायम ये-जा करतात रीक्षावाले रोज आपल्या पोटासाठी या रस्त्यावरुन आपली भाडी मारतात. अशा सर्व लोकांचा जीव या रस्त्यामुळे धोक्यात आला आहे. तुम्ही एसी गाडीतुन फिरता. तुम्हाला रस्ता खराब असल्याचे महत्त्व कळणार नाही, असे सांगत आता पावसाळा जवळ आला आहे. तुमची पोकळ आश्वासने नको ठोस निर्णय द्या असे बंगे यांनी खडसावले.
जि. प. सदस्य रूपेश पावसकर यांनी रत्नागिरी येथील अधिक्षक अभियंता दीनेश बगुल यांना भ्रमणध्वनी करुन रस्ता खड्डे बुजवून सुस्थितीत होणार नसुन वालावल ते कवठी पर्यंत पुर्ण कार्पेट मारण्याची मागणी केली केली. त्यावर तशा प्रकारची तरतुद करुन कार्यवाही करु असे आश्वासन श्री. बागुल यांनी दिले. तसेच कार्यकारी अभियंता सौ. इंगवले यांनीही आपण शासनस्तरावर याबाबत त्वरित कळवत आहोत असे सांगितले. त्यांनतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, नेरुर जिल्हा परिषद शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, कवठी उपसरपंच सौ. खडपकर, चेंदवण उपसरप निलेश माधव, कवठी माजी सरपंच रुपेश वाड्येकर, कवठी माजी उपसरपंच अरुण परुळेकर, प्रशांत तेंडुलकर, विजय मेस्त्री, चेंदवण शिवसेना उपविभाग प्रमुख संदीप नाईक, भुपेश चेंदवणकर, राजु पोयरेकर, हेमंत वालावलकर, रवि कावळे, आपा वालावलकर, दादु कोळंबकर, बाळा धुरी, विजय लाड, गजा शिरसाट, नागेश बंगे, विठ्ठल घारे, शामा सांगळे, महेंद्र तेली, रुपेश खडपकर, गजा कवठकर, गोविंद पेडणेकर, रवि तोरसकर आदी ग्रामस्थ महीला युवक आणि सर्व पक्षीय लोक सहभागी झाले होते.

error: Content is protected !!