मालवण ओझर येथे पेट्रोलसाठी मंगळवारी नागरिकांची गर्दी

मालवण तालुक्यातील ओझर येथील पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळपासून पेट्रोलसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपाबाहेर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल दरवाढ किंवा तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांनी आपली वाहने घेऊन पेट्रोल भरून घेण्यासाठी पंपावर गर्दी केली. सकाळी 9 वाजल्यापासूनच दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांची रांग सुरू झाली. गर्दी वाढल्याने वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला.
पेट्रोल पंप व्यवस्थापनाने मात्र सध्या पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. “सध्या नियमित पुरवठा सुरू आहे.





