विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान

इचलकरंजी येथील लायन्स क्लब तर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार 2025-26 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सोहनजी शिरगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विनायक भोसले यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भोसले यांचे कुटुंबीय, घोडावत शैक्षणिक संकुलातील सहकारी, मित्रपरिवार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना विनायक भोसले म्हणाले , की संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ यावरच आत्तापर्यंतचे कार्य करू शकलो आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नीने उचललेली घराची व मुलांची जबाबदारी, संस्थेतील सर्व सहकाऱ्यांची मदत यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेत काम करत असताना केवळ बॉस या भूमिकेत न राहता लीडर म्हणून कार्य करत असल्याचे समाधान व्यक्त केले. या पुरस्कारामुळे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून विनायक भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!