कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीच्या वतीने आनंदाच्या शिधा चे वितरण

सोसायटी चेअरमन संदीप नलावडे यांनी केले आनंदाचा शिधा किट चे वितरण

राज्य सरकारच्या माध्यमातून प्राप्त झालेला आनंदाचा शिधा कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीच्या मार्फत रेशन कार्डधारकांना आजपासून वितरण करण्यात आला. कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे व सेक्रेटरी सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन दुकानदार रुपेश पेडणेकर यांच्या मार्फत आनंदाचा शिधा कार्डधारकांना वितरण करण्यात आला. यामध्ये एक लिटर तेल, एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, असे साहित्य देण्यात येत आहे. यावेळी कार्डधारकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!