खारेपाटण रामेश्वर नगर शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश

सन 2022 व 2023 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षांमध्ये खारेपाटण रामेश्वर नगर शाळेच्या मुलांनी विशेष यश प्राप्त केले.
या शैक्षणिक वर्षात ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षा, भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा, व आर टी एस अशा चार स्पर्धा परीक्षांसाठी 16 मुले सहभागी झाली होती. त्यापैकी पाच मुलांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. व इतर मुलांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले .केवळ दोन मुले अनुत्तीर्ण झाली .
या यशाबद्दल खारेपाटन केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री सद्गुरु कुबल यांनी शाळेला भेट देऊन मुलांचे व शिक्षकांचे खास अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निकाल पुढीलप्रमाणे —-

🔶एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा🔶
इयत्ता 4 थी गुण 300पैकी
1) आराध्या समीर पराडकर -234
2) आयुष महावीर होनाळे -212
3) समर्थ श्रीकांत सलागरे -150
4) ऋग्वेद उदय जामसंडेकर- 134
5) साईराज बाळासाहेब जाधव -104

🔶 सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षा🔶
इयत्ता – दुसरी गुण -200पैकी
1) उत्कर्ष संगप्पा गुरव- 148
2) पूर्वा प्रशांत सुतार -174
3) उन्नती उल्हास राऊत – 156
4) नक्षत्रा संदीप पाटील -82
5) निरज सुरेंद्र राऊत – 78

   इयत्ता तिसरी

1) विभा गिरीश धुमाळे -170
2) स्वस्तिक सुरेश करांडे -92

    इयत्ता चौथी

1) आराध्या समीर पराडकर -146
2) आयुष महावीर होनाळे- 126
3) ऋग्वेद उदय जामसांडेकर-108
4) साईराज बाळासाहेब जाधव -86
5) समर्थ श्रीकांत सलागरे- 96

🔶 R T S परीक्षा 🔶
इयत्ता- 3 री गुण – 200 पैकी
1) विभा गिरीश धुमाळे -158

   *  राज्यात अकरावी
   * जिल्ह्यात दुसरी
   * तालुक्यात पहिली

🔶 ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा ,🔶

इयत्ता – पहिली गुण – 100 पैकी
,1) प्राची संतोष धुळप- 48
2 ) रियांश भावकू पाऊसकर- 37

     इयत्ता दुसरी

1) पूर्वा प्रशांत सुतार — 92
( सिल्वरपदक )
2) उत्कर्ष संगप्पा गुरव – 78

  इयत्ता - तिसरी

1) विभा गिरीश धुमाळे- 93
( सिल्वरपदक )
2) गार्गी श्रीपाद भडाळे – 74
3) स्वस्तिक सुरेश करांडे -40

    इयत्ता चौथी
 1) आराध्या समीर पराडकर -61

सर्व मुलांना मुख्याध्यापक श्रीमती छाया पडोळकर उपशिक्षक श्री संतोष धुळप आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती नंदिनी पराडकर व उपाध्यक्ष श्रीमती मनाली होनाळे यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले. व सर्व मुलांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले .तसेच बालवयापासूनच स्पर्धा परीक्षेचा सराव हवा यासाठी जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धा परीक्षांना बसावे कशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षात शाळा खारेपाटन रामेश्वर नगर मध्ये जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा तसे पालकांना आवाहन केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!