सुपर-३० संचलित युरो किड्स प्री स्कूल ओरोसचे स्नेहसंमेलन संपन्न

ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : ओरोस मधील युरो किड्स प्री स्कूल संस्था विद्यार्थ्यांवर बाल वयात संस्कार करणारी एक उत्तम संस्था असून त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विविध उपक्रम राबवले जातात ही समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे .अष्टपैलू व्यक्तित्व लाभलेले शिक्षक ही या संस्थेची फार मोठी संपत्ती आहे. त्यामुळे इथून बाहेर पडलेला विद्यार्थी हा विविध कला कौशल्यासह उत्तम संस्कार घेऊनच बाहेर पडेल “असे उद्गार पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ सुप्रिया वालावलकर यांनी काढले. ओरोस सुपर ३० संचलित ओरोस येथील येथील युरो किड्स प्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. त्यांनी या संस्थेचे संचालक सचिव अर्जुन सातोस्कर, सौ. नीता सातोस्कर मुख्याध्यापिका सौ. निधी गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचं कौतुक केले व संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुपर 30 सिंधु शैक्षणिक न्यास संचलित युरोकीडझ प्रीस्कुल ओरोस “युरोत्सव 2023” स्नेहसंमेलनाचे दिमाखात उद्घाटन संस्थेचे सचिव अर्जुन केशव सातोस्कर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्या सौ. सुप्रिया संतोष वालावलकर यांच्यासह शिक्षक पालक संघाचे सर्व पदाधिकारी आदींसह सर्व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांना, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक वर्षामध्ये, मिळविलेल्या यशाबद्दल पदक व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा कार्यक्रम खास आकर्षण राहीला. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. निधी गोसावी, शिक्षक ममता गांधी, संपदा आळवे, तेजस्विनी सावंत, प्रज्ञा गावडे आदींसह शिक्षकेत्तर वृंद, पालक तथा विद्यार्थी उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!