सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसूलकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खारेपाटण बाजारपेठ मुख्य दरवाजा येथे स्वखर्चाने दिला एल ई डी लाईट
खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत, खारेपाटण बाजारपेठ येथील मुख्य दरवाजा येथे एल ई डी लाईट दिली. सध्या होळी उत्सवानिम्मित खारेपाटण येथील देव मांडावर जात असतात तथा अनेक देवदेवतांच्या पालख्या खारेपाटण येथे येत असतात. काही वेळेस या पालख्या रात्री च्या वेळेस देखील गावात दाखल होतात, पालखी नृत्य, ढोल वाजप केले जाते. अश्या वेळी येणाऱ्या भाविकांना अंधारातून जायला लागू नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये हा विचार करून श्री. महेश कोळसूलकर यांनी 6000₹ किंमतीचा एल ई डी लाईट प्रदान केला. या सामाजिक बांधिलकी बद्दल महेश कोळसुलकर यांच्यामुळे खारेपाटण येथे देण्यात आलेल्या एल ई डी लाईट बद्दल समाधान व्यक्त होत आहे.





