आचरा पिरावाडी येथे शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

आचरा पिरावाडी गाबीत समाजाच्या शिमगोत्सवास गुरुवार 5 मार्च पासून सुरुवात होत आहे. 11 मार्च पर्यंत चालणा-या या शिमगोत्सवात ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 5 मार्च रोजी पहाटे संत तुकाराम बिज साजरी करणे. ( घुडघुडा) संध्याकाळी ठिक 4 वाजता मांड उभा करणे, आणि श्री देव चव्हाट्या वरील कोळीण , बाळ गोपाळ मंडळी रामेश्वर भेटी साठी रवाना होतात. ब्राम्हणदेव गाऊडवाडी, होळदेव देऊळवाडी, श्री रामेश्वर मंदिर देऊळवाडी, श्री रवळनाथ मंदिर देऊळवाडी, आचरा ग्रामोपाध्याय श्री निलेश सरजोशीच्या घरी व नंतर बौद्धवाडी भंडारवाडी येथे पुर्वांपार प्रथेप्रमाने भेट दिली जाणार आहे.येताना झेला ची फुले घेवून 8 : 30 ला श्री देव चव्हाट्यावर आगमन. रात्रौ ठिक 9 : 30 वाजता श्री तरुण संघ दक्षिणवाडा यांचे सुश्राव्य घुमट वादन , रात्रौ 10 : 30 वाजता श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व्हरायटी शो 2026 सादर होणार आहे.
6 मार्च रोजी रात्रौ ठिक 9 : 30 वाजता. मधलावाडा ग्रामस्थ सभा आचरे पिरावाडी यांचे सुश्राव्य घुमट वादन , रात्रौ ठिक 10 : 30 वाजता यशवंत बाल नाट्य मंडळ मधलावाडा प्रस्तुत दोन अंकी विनोदी मालवणी नाटक. भावकी सादर होणार आहे.
दिनांक . 7 मार्च रोजी रात्री ठिक 9 : 30 वाजता श्री राधाकृष्ण देवस्थान कृष्णनगर पिरावाडी यांचे सुश्राव्य घुमट वादन. रात्रौ ठिक 10 : 30 वाजता. श्री बाळ गोपाळ दिंडी भजन मंडळ आचरा वरचीवाडी यांचे , दिंडीनृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक . 8 मार्च रोजी रात्रौ ठिक 9 : 30 वाजता श्री विठ्ठल समाज विकास मंडळ उत्तरवाडा यांचे सुश्राव्य घुमट वादन. रात्रौ ठिक 10 : 30 वाजता गंधर्व ग्रुप देवली मालवण निर्मित दोन अंकी मालवणी विनोदी नाटक . सध्या ह्या शिक्षणाची गरज हा.
दिनांक 9 मार्च रोजी रात्रौ ठिक 9 : 30 वाजता सर्व ग्रामस्थांचे एकत्रीत सुश्राव्य घुमट वादन . रात्रौ ठिक 10 : 30 वाजता ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी प्रस्तुत , कलारंगभूमी निर्मित कोटुंबिक जिव्हाळ्याचे दोन अंकी नाटक
घराबाहेर एक अधुरं स्वप्न रात्री 12 वाजता श्री देव चव्हाट्याला पचिक घालणे,
10 / 3 / 2026 रोजी पहाटे 5 : 30 वाजता घुमट , भुपाळी , आरती 7 वाजता गुलाल उडविणे धुळवडीने कार्यक्रमाची सांगता.
दिनांक 11 / 3 / 2026 रोजी महाप्रसाद दुपारी ठिक 12 : 30 वाजता. तरी सर्वांनी याकार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामोन्नती मंडळाकडून करण्यात येत आहे.





