मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालवणात शुद्धलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रोटरी क्लब मालवणतर्फे मराठी शुद्धलेखन स्पर्धा; ५७ स्पर्धकांचा सहभाग
मराठी भाषा गौरव दिन साजरा; शुद्धलेखन स्पर्धेत प्रा. सुमेधा नाईक प्रथम
रोटरी क्लब मालवणचा उपक्रम : शुद्धलेखन स्पर्धा व गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण तर्फे मराठी शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा १८ वर्षावरील व्यक्तीसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला खूप छान प्रतिसाद मिळाला. ५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. टोपीवाला हायस्कूलचे धामापूरकर सर यांनी परीक्षक म्हणून मोलाचे सहकार्य केले. कन्याशाळेचे खूप सहकार्य लाभले. यामधे प्रा. सुमेधा नाईक प्रथम, गौरी पाटकर द्वितीय, डॉ. रुपाली पंतवालावलकर तृतीय, अस्मिता रावराणे उत्तेजनार्थ, हर्षदा माने उत्तेजनार्थ यांनी यश मिळवले. सर्वांना रोख रक्कम व पहिल्या तीन क्रमांकना चषक प्रदान करण्यात आले. सर्व स्पर्धकाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व बक्षिसे डॉ. अजित लिमये यांनी पुरस्कृत केली होती. बक्षीस समारंभ २७ फेब्रुवारी रोजी हॉटेल लिलांजली मधे पार पडला. यावेळी रोटरी क्लब मालवण, भगीरथ प्रतिष्ठान, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या सहयोगातुन १० गरजु विद्यार्थ्याना सायकली देण्यात आल्या.
यावेळी रोटरी अध्यक्ष रो पंकज पेडणेकर, सेक्रेटरी रो तांबे, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अजित लिमये, रो. श्रीकृष्ण तारी, रो साळगावकर, रो. संगोडकर, रो अभय कदम, रो वाक्कर, रो वनकुद्रे, रो प्रविणा शिंदे, रो प्रदीप सामंत, रो सुविधा तिनईकर, उपस्थित होते. सूत्रसंचालन रो. डॉ. लीना लिमये यांनी केले तर आभार रो महादेव पाटकर यांनी मानले. प्रा. सुमेधा नाईक व नंदिनी साटेलकर मॅडमनी मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.





