सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला याचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि फनफेअर कार्यक्रम संपन्न
ब्युरो । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला याचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ खरगपूर आआयटी आणि पवई आआयटी मध्ये शिक्षण घेतलेले आणि आता मुंबई मधील अस्मीता आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक नाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी बोलताना विनायक नाबर म्हणाले, आज मी शाळेत विद्यार्थ्यांनी भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली त्यावेळी विद्यार्थी ज्या पद्धतीने विश्लेषण करून माहिती देत होते यावरून हे विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही मागे राहणार नाहीत याची मला खात्री झाली असे सांगून विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक केले. या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या अनेक कमिट्यांवर कार्यरत असलेले विनयकुमार आवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव आनंद परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्यातून खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावण्यात आले होते. या दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमाला पर्यटन महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वेंगुर्ले