शिवसेनेच्या वतीने कुडाळात ९ मार्चला ‘जागर स्त्री शक्तीचा’

जागतिक महिला दिनाचे औचित्य
विविध स्पर्धाचे आयोजन
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले. येथील सिंधुदुर्ग राजा मैदानावर दुपारी ३ वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी दिली. शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
शिवसेना कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला नगरसेविका चांदणी कांबळी, शहर अध्यक्ष श्रुती वर्दम, नयना मांजरेकर, शिवसेना तालुका सचिव रेवती राणे, तालुकाप्रमुख युवती दिपाली कानसे, उप तालुकाप्रमुख जान्हवी कदम, जिल्हा सचिव दादा साईल, शहर अध्यक्ष अभी गावडे, उप शहर प्रमुख चेतन पडते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कुडाळ – मालवण विधानसभा आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ च्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता शिरवलकर, मालवण नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खेळ पैठणीचा देखील होणार आहे. यासाठी आकर्षक बक्षिसे आहेत. प्रथम क्रमांक – पैठणी, द्वितीय क्रमांक- सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीचा करंडा आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहे.
तसेच हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला असून प्रत्येक महिलेला सौभाग्य वाण देण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा कार्यक्रम देखील होणार असून विजेत्या स्पर्धकांना चांदीचे नाणे बक्षीस मिळणार आहे.
खवय्यांसाठी खाऊवल्ली, शॉपिंग स्टॉल्स, निमंत्रितांचे गृप डान्स, फटाक्यांची आतिषबाजी हे देखील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. महिलांचे ढोलताशा पथक हे खास आकर्षण आहे.
महिलांसाठी उखाणा स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकाना आकर्षक बक्षिसे तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेटवस्तू मिळणार आहे. यासाठी कु. चांदणी कांबळी (9921056419), आणि सौ. श्रृती वर्दम (9421145041) यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
महिलांसाठी नाचणी या खाद्य पदार्थावर पाककला स्पर्धा होणार आहे. यासाठी पहिल्या तीन क्रमांकाना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. यात सहभागी होण्यासाठी सौ. रेवती राणे (9422379612), सौ. रेखा काणेकर (9765231143) यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
सर्व महिला प्रेक्षकांसाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कार्यक्रमात उपस्थित महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जि प सदस्य तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी केले आहे.





