वालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन

कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल यांच्यातर्फे श्री देव रवळनाथ वर्धापन दिन २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता यजमान देहशुद्धी, परिवार देवता बहुमान समर्पण, गणपती पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, धार्मिक विधी सुरुवात होईल. तर सकाळी ९ वाजता भाविकांचे श्री चरणी लघुरुद्र/अभिषेक, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!