वागदे येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन

लाभ घ्यावा असे दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांचेकडील आदेशान्वये कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने वागदे मंडळ स्तरावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन शनिवार 7/3/2026 रोजी गोपूरी आश्रम बहु उद्देशिय सभागृह वागदे (मे. नाईक पेट्रोल पंप यांच्या मागील बाजूकडील) येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत करणेत आले आहे.
सदर शिबिराच्या ठिकाणी रेशन कार्ड मधील नाव कमी करणे किंवा दाखल करणे बाबत तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे. तसेच प्रलंबित फेरफार, जातीचे व उत्पन्नाचे दाखले, ७/१२ मधील दुरुस्ती, अकृषिक (एनए) परवानगी विषयी मार्गदर्शन, तसेच विविध संजय गांधी योजना अंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार असे शेरे काढण्यासाठी चे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अशा एकूण १४ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वागदे महसूल मंडळ परिसरातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. तहसिलदार कणकवली यांनी केले आहे.





