वेताळ बांबर्डेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कुडाळ ; वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आज विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने वेताळ बांबर्डे महामार्ग स्टॉप येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य, वेताळ बांबर्डे प्राथमिक शाळा नं. २ चे विद्यार्थी, शिक्षिका तेली मॅडम, शिक्षिका चव्हाण आदी उपस्थित होते.
तसेच वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उन्नती हितवर्धक मंडळ, वेताळ बांबर्डे-कपिलनगर आणि एकलव्य वस्तीगृह येथे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे सुद्धा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!