रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्षपदी मा. संजयराव शिर्के यांची निवड

शैक्षणिक धोरणाविरुद्ध वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, अशी नूतन अध्यक्ष यांची ग्वाही
रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ, रत्नागिरी रजि. नं. महाराष्ट्र /5357/ रत्नागिरी दि. 25/9/2014 यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रिगल हॉल, रिगल कॉलेज जवळ कोंढे तालुका चिपळूण येथे संपन्न झाली. शिक्षण महर्षी अरुअप्पा जोशी, ॲड. विलास पाटणे साहेब इत्यादी दिग्गजांनी परिश्रम घेऊन 2014 मध्ये संघाची स्थापना केली. सदरचा संघ हा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे शी संलग्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांना एका छताखाली आणून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम संघ करीत असतो. संस्था व अध्यक्ष वर्क कौन्सिल रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. विलासजी पाटणे साहेब, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ श्री. सदानंद भागवत साहेब यांचे नंतर तिसरे अध्यक्ष म्हणून रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारचे बदलते शैक्षणिक धोरण व संस्थांवर होणारा अन्याय, संस्थांच्या समोरील विविध प्रश्न, विद्यार्थ्यांचा घटता पट अभावी बंद होणारे शाळा, संच मान्यता निकष, शिक्षक समायोजन, वेतनेतर अनुदान शिक्षक व शिक्षकेतर संघटना मागण्यांना होणारा विलंब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदे आधी विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. या सभे प्रसंगी सर्व संघटना पदाधिकारी, संस्था अध्यक्ष, संचालक, संस्था प्रतिनिधी यांनी याबाबत आवाज उठवला. या लढ्याला गती, उर्जित अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी अध्यक्षपदी एक खंबीर नेतृत्व निवड करण्याची गरज आहे असे मत सभेत प्रकर्षाने पुढे आले. यासाठी सभागृह आणि मा. संजयराव शिर्के साहेब यांचे अध्यक्षपदी एकमताने निवड केली.
श्री. संजय राव शिर्के हे कौशल्य विकास संस्था परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष या पदावर काम करीत आहेत. तसेच त्यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील 'उत्कृष्ट नेतृत्व' पुरस्कार 'इकॉनोमिक अँड सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन', नवी दिल्ली आणि दिला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील 'कोकण आयडॉल' पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने 'मराठा भूषण' पुरस्कार, असे अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे अडचणी, प्रश्नांना न्याय देण्यासाठी, संघटना मजबुतीसाठी यापुढे सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहील असेच सुतोवाच माननीय श्री. संजयराव शिर्के साहेब यांनी याप्रसंगी केले. शासनाच्या नियमांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे शाळा चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेळ पडल्यास शैक्षणिक धोरणाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करू व शैक्षणिक संस्थांना न्याय मिळवून देऊ. शासन नियमित शैक्षणिक संस्थांना दुय्यम स्वरूपाची वागणूक देत असते त्यामुळे यापुढे सर्व संस्थांना योग्य तो मान मिळवून देण्याची नूतन अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के यांनी ग्वाही दिली.
जिल्ह्यातील संघटना मजबूत करून संस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन ते सोडवण्याचे प्रयत्न करू, तसेच तालुका निहाय समिती स्थापन करून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम करू व संघटना सदस्यांच्या प्रश्नांना कायम उत्तरदायी राहण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
संत शिरोमणी गोरोबा सेवा संघ जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष व कालुस्ते पंचक्रोशी ग्रामविकास मंडळ सदस्य श्री. सुभाष गुढेकर साहेब यांची संघटनेच्या सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. या वेळी रत्नागिरी जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. विलास पाटणे साहेब यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल राहतील असा मला विश्वास वाटतो असा विश्वास व्यक्त केला. संघटना पारदर्शनी आणि कार्यदक्ष राहील याकडे अध्यक्ष लक्ष देतील असे सुतोवाच त्यांनी केले.
सदर सभेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम. सेक्रेटरी महेश महाडिक नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे मंगेश उर्फ बाबू तांबे, भगवान परशुराम शिक्षण मंडळाचे श्री. अभय दादा सहस्त्रबुद्धे, कृषी भूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेचे सचिव श्री मिलिंद सुर्वे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. प्रशांत देवळेकर, श्री. महेश लकेश्री, श्री. रामराजे कॉलेज संस्थापक श्री. संदीप राजपुरे, प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संघटनेचे कोषाध्यक्ष श्री. सुधीरजी दाभोळकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे श्री. अभिजीत हेगशेटये, रामपूर एज्युकेशन सोसायटीचे श्री. साळवी साहेब इत्यादी रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार श्री. शेखरजी निकम सर व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री .तानाजीराव चोरगे यांनी अध्यक्षांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. चिपळूण परिसरातील प्रतिष्ठित व शिक्षण प्रेमींकडून नूतन अध्यक्षांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





