तीर्था कोचरेकरचे नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड मध्ये यश

कुडाळच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची विद्यार्थीनी
कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलने नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड (ITO) मध्ये पुन्हा एकदा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गेल्यावर्षी प्रशालेमध्ये संपन्न झालेल्या इयत्ता १ ली ते ७ वी मधील एकूण ६४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्साहाने सहभाग घेतला होता त्यापैकी इयत्ता सातवी मधील कु. तीर्था ममता महेश कोचरेकर या विद्यार्थिनीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची चमक दाखवत हे यश संपादन केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थ्यांनी आपापल्या इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या मजबूत शैक्षणिक पायाभरणीचे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना घडवण्याच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण सादर केले.
कु. तीर्था कोचरेकर हिने नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड मध्ये राज्यस्तरीय ४ था क्रमांक मिळवून स्टेट टॉपर म्हणून मान मिळवला आहे.
शाळा व्यवस्थापनाने सर्व सहभागी विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे त्यांच्या परिश्रम व समर्पणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच यशांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, शिक्षकवृंद या सर्वानी अभिनंदन केले आहे.





