कळसुली आरोग्य केंद्राला “एमबीबीएस” डॉक्टर द्या अन्यथा उपोषण छेडणार!

कळसुली सरपंच सचिन पारधीये यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना इशारा
प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय पोळ, यांची पदोन्नती झाल्यानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुलीचे वैद्यकिय अधिकारी पद रिक्त असून, सद्यस्थितीत सदरचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणारे प्रभारी आरोग्य अधिकारी, हे वेळेवर उपस्थित नसतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध नसतो. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र पाहता व रुग्णांची संख्या पाहता, प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुलीचे वैद्यकिय अधिकारी पदी एम.बी.बी.एस्. दर्जाचे कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी तात्काळ नियुक्त करणेत यावे.18 एप्रिल पर्यंत जर एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत तर कळसुली ग्रामस्थांसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच सचिन पारधीये यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली