कणकवली मध्ये इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साज ची स्थापना

पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साज या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेची पहिल्यांदाच स्थापना करण्यात आली. यापूर्वी सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, बांदा येथे या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. परंतु कणकवली येथे पहिल्यांदा हि संस्था नगरसेविका मेघा गांगण यांच्या प्रयत्नातून स्थापन करण्यात आली.
यांचा पदग्रहण व चार्टर प्रेझेंटेशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात हाॅटेल रिलॅक्स येथे पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या प्रसंगी डिस्ट्रिक्ट 317 च्या इनरव्हील चेअरमन डॉ. उत्कर्षा पाटील, ESO हर्षदा मराठे, PDC डॉ. सायली प्रभु यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इनरव्हील क्लब ऑफ कणकवली साजच्या चार्टर अध्यक्षा राजश्री रावराणे, चार्टर सेक्रेटरी लीना काळसेकर, ISO उज्ज्वला धानजी व ट्रेझरर दिशा अंधारी यांनी पदभार स्वीकारला.
कणकवली येथे इनरव्हील क्लब स्थापन होण्यासाठी प्रोत्साहन देणारे रोटरी क्लब ऑफ कुडाळचे असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने तसेच क्लबला पुरस्कृत करणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सानिका मदने व त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले.
एजी सचिन मदने यांच्या प्रयत्नांना सहकार्य करून क्लब स्थापन करण्यासाठी मेघा गांगण यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रज्ञा ढवण, प्रियाली कोदे, प्रणाली चव्हाण, संध्या पोरे, अंकिता करपे, उमा परब, अर्पिता मुंबरकर, निलिमा नाटेकर, सुंदर मालविय, सुप्रिया नलावडे, दिशा राणे, दर्शना राठोड, सोनाली परब, संपदा पारकर, सुजाता अक्कतंगेरहाळ यांना इनरव्हीलची पीन प्रदान करण्यात आली.
तसेच इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या कशाळीकर मॅडम, वैभवी शेवडे, दर्शना रासम, दर्शना देसाई, पूजा पोकळे, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या अश्विनी डांगी आणि प्रीती तायशेटे रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष एड. राजेंद्र रावराणे, रो. एड. दीपक अंधारी, रो. डाॅ. विद्याधर तायशेटे, रो. महेंद्र मुरकर, रो. तृप्ती कांबळे, रो. लवू पिळणकर, रो. संतोष कांबळे, रो. दीपक बेलवलकर, रो. रवी परब, रो. प्रमोद लिमये यांच्यासह अनेक सदस्य शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमात नवीन कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थितांनी नव्या टीमला शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ यांच्यावतीने इनरव्हीलचा लोगो असलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!