भाजपा कणकवली शहर मंडल चेपंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान उत्साहात

पालकमंत्री मंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
प्रमोद जठार यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मंडल निहाय घेतले जात आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ म्हणून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी प्रत्येक केंद्रप्रमुख तसेच मोर्चाचे अध्यक्ष यांच्यासाठी हे प्रशिक्षण 24 तासांचे म्हणजेच निवासी प्रशिक्षण पक्षाच्यावतीने घेतली जात आहेत, कणकवली शहर मंडल चे प्रशिक्षण वर्ग माती रिसॉर्ट तरंदळे येथे संपन्न झाले. यामध्ये सकाळच्या सत्रात उद्घाटन माजी आमदार प्रमोद जी जठार साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत, गटनेत्या सुप्रिया नलावडे, सभापती हर्षदा वाळके, मनोज रावराणे, सदस्य शीतल दळवी, संदीप मेस्त्री, परशुराम झगडे, सुरेश सावंत, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, विठ्ठल देसाई, समीर सावंत किशोर राणे आदी उपस्थित होते.
वंदे मातरम व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर सत्र एकूण सदर प्रशिक्षण घेऊन सात सत्रांत होते. यामध्ये पक्षाने दिलेल्या विषयांसाठी वक्ते नेमून पदाधिकारी यांना मार्गदर्शन व्हावे व पक्षाचे ध्येय धोरण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना मजबुती करण्यासाठी हे अभियान केले गेले आहे.
यामध्ये 1 – विषय-पक्षाचा इतिहास व विस्तार त्यासाठी प्रमोद जठार
2 विषय – बूथ व्यवस्थापन वक्ता -अजित गोगटे
3 विषय — आपली कार्यपद्धती वक्ता संतोष कानडे
4 विषय – कार्यविस्ताराची आपली दृष्टी
वक्ता–प्रकाश गोगटे
5 विषय – वैचारिक अधिष्ठान वक्ता –डॉक्टर मिलिंद कुलकर्णी
6 विषय आपल्या सरकारची कामगिरी.
वक्ता – हर्षदा वाळके
7 विषय – सोशल मीडिया,, एआय, नमो ऍप, सरल ऍप.
वक्ता – संदीपजी साटम
यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मधील पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेली कामे यांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. सायंकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशीच्या सत्रात योगा करून राष्ट्रगीताने या अभियानाचा समारोप करण्यात आले. मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अभियान संयोजक प्रदीप गावडे, मेघा गांगण, बबलू सावंत यांनी समिती म्हणून काम केले, तसेच अभियान साठी अण्णा कोदे, संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, राजेश हिर्लेकर, समर्थ राणे, सर्वेश दळवी, अमोल रासम, सागर राणे, नयन दळवी, संदेश सावंत, लक्ष्मण घाडीगांवकर, आदिनी सहकार्य केले.





