कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांना न्यायालयाच्या अवमान याचिके प्रकरणी हजर राहण्याबाबत नोटीस

कणकवलीतील एका बांधकामाबाबत कोल्हापूर सर्किट बेंच जवळ दाखल आहे प्रकरण

मुख्याधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयात मध्ये उपस्थिती लावल्याची सूत्रांची माहिती

कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये दाखल झालेल्या कणकवलीतील एका मालमत्ते संदर्भातील अवमान याचिके प्रकरणी स्वतः आज कोर्टात हजर राहण्याबाबत नोटीस बजावणी झाली होती. मुख्याधिकारी म्हणून गौरी पाटील यांना नावानेच नोटीस आल्याने नगरपंचायत प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या प्रकरणाची सुनावणी होती. त्यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील या नोटीस नुसार न्यायालयात हजर झाल्याचे समजते. कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील एका न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या मालमत्ते प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्या बाबत मुख्याधिकारी गौरी पाटील यांना नोटीस आल्याने या प्रकरणात आता एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. गेले काही दिवस हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये सुरू असून या प्रकरणी आता मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी नोटीस आल्याने आता याबाबत मुख्याधिकारी काय भूमिका घेतात व न्यायालय त्यांना काय आदेश देते त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!