महामार्गावर पावशी येथे अज्ञातकडून टायर पेटवल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबई गोवा महामार्गावर पावशी – घावनळे फाटा जवळ अज्ञातांकडून टायर पेटविण्यात आले. महामार्गावर टायरला आग घातल्याने गोव्याकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हि घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.
महामार्गावर नांदगाव येथे आंबा बागायतदारांच्या विविध मागण्यांबाबत आज रास्ता रोको आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे कुडाळ जवळ पावशी येथे अज्ञातांकडून महामार्गावर टायर पेटविण्यात आले. यामुळे एका बाजूच्या लेनवरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

error: Content is protected !!