भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत दिशा स्पोर्ट्स विजयी

भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत स्टार इलेव्हन गृप चिंदर आयोजित चिंदर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दिशा स्पोर्ट्स संघाने आई पावणाई संघावर मात करत चषकाचे मानकरी ठरले. उपविजेता ठरला तो आई पावणाई। संघ. विजेत्या संघाला सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले.. यावेळी भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,माजी उपसभापती राजू परुळेकर,पंचायत समिती सदस्य मालवण दीपक सुर्वे,खरेदी विक्री संघ चेअरमन राजनजी गावकर,सामाजिक कार्यकर्ते समिर हडकर, चिंदर तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गावकर,चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र उर्फ सिताराम हडकर,रवी घागरे सागर अपराज, संतोष अपराज, दिगंबर जाधव ,शेखर पाताडे, दिनेश पाताडे ,अजित साटम, सुबोध गावकर ,शोधन मौजेकर ,स्वरा चिंदरकर पुरुषोत्तम परब अरविंद घाडी भाई अपराज विजय घाडी केशव पडवळ प्रकाश पडवळ यांसह स्टार इलेव्हन संघाचे सर्व सदस्य व क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत
तृतीय क्रमांक मालवणी ढाबा,
चतुर्थ क्रमांक नवदुर्गा इलेव्हन,
उत्कृष्ट फलंदाज लिलेश मांजरेकर
उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील चिंदरकर
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निखिल घाडी
अंतिम सामना सामनावीर
प्रतीक जीकमडे
मालिकावीर दर्शन चिंदरकर यांना गौरविण्यात आले.

error: Content is protected !!