हळवल येथे श्रीराम मंदिर येथे १०२ वा रामनवमी उत्सव व द्वितीय वर्धापन दिन सोहळा

राममंदिर हळवल येथे दि. १९ मार्च ते २६ मार्च २०२६ या दरम्यान संपन्न होणार सोहळा कार्यक्रम

                                                                          श्रीराम सेवा मंडळ मुंबई हळवल, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने १०२ वा रामनवमी उत्सव व द्वीतीय वर्धापन दिन सोहळा दि. १९ मार्च ते  दि.२६ मार्च २०२६ या दरम्यान संपन्न होणार असून मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम व श्रीराम नवमी उत्सव सांगता समारंभात ग्रामस्थ, भाविक बंधू भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी सह या सोहळयास उपस्थित राहून श्रीराम दर्शन व तिर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवल) यांच्यावतीने करण्यात आली आहे.                                                             श्रीराम नवमी उत्सव दैनंदिन कार्यक्रम  दि. २० मार्च २०२६ ते गुरूवार दि. २६ मार्च २०२६ यादरम्यान संपन्न होणार आहेत. सायं ६.३० ते ७.३० भाविक, बाळ गोपाळ आणि वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ प्रदक्षिणा, रात्रौ ९.३० ते ११.०० वारकरी संप्रदाय मंडळाचे कीर्तन शनिवार दि. १९ मार्च रोजी ह. भ. प. डॉ. शांताराम राणे-हळवल महाराज, दि. २० मार्च ह. भ. प. रविकांत ठाकुर महाराज-हळवल, दि. २१ मार्च ह. भ. प. ओमकार सावंत महाराज - शिरवल, दि. २२ मार्च ह. भ. प. हरिविजय नेरूरकर महाराज - कळसुली, दि. २३ मार्च ह. भ. प. रामचंद्र कदम महाराज -कुंदे, दि. २४ मार्च ह. भ. प. प्रकाश सावंत महाराज-भिरंवडे, दि. २५ मार्च ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज - शिरवल. 
श्रीरामनवमी कार्यक्रम                                                                गुरूवार दिनांक २६ मार्च २०२६ सकाळी ८.३० वा. श्रीराम षोडशोपचार पुजा, सकाळी ९.०० वा. उत्सवाचं ग्रामदेवतेला आमंत्रण, सकाळी १०.००वा. श्रीराम जन्माचे कीर्तन - ह. भ. प. नामदेव पांडुरंग महाराज, दुपारी १२.०० वा. राम जन्म सोहळा दर्शन व तिर्थप्रसाद, दुपारी १.००  वा. श्रीराम पालखीचे अभंग ढोल ताशांच्या गजरात व राम नामाच्या जयघोषात प्रदक्षिणा, दुपारी १.३०वा. महाप्रसाद सायं. ६ ते ७वा. वारकरी भाविक व बाल गोपाळांचा हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, हळवल यांचे भजन, रात्रौ ९ वा. श्रीराम पालखीचे अभंग टाळ ढोलताशाच्या गजरात व श्रीराम नामाच्या जय घोषात प्रदक्षिणा, रात्रौ ११ वाजता कीर्तन, रात्रौ १२ वाजता दशावतारी नाटक (श्री शिवराई रवळनाथ नाट्यमंडळ, हळवल संचालक-अरुण राणे) तसेच दिनांक २७मार्च २०२६ रोजी श्रीराम नवमी उत्सव समाप्ती व महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १.०० ते ३.००वा होणार आहे. श्री रामनवमी उत्सव २०२६ कालावधीत संतपंगत सौ. तनुजा वेळकर, पुंडलिक तावडे, प्रशांत राणे, रविंद्र राणे, ध्रुव राणे, पल्लवी राणे यांची असणार आहे. तर रामनवमी उत्सव महाप्रसाद रमेश राणे, पिंपळवाडी हळवल                                                       श्रीराम मंदिराचा द्वीतीय वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी १०.०० वाजता श्रीरामाची षोडशोपचार, पूजा, अभिषेक आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०१.०० वाजता महाप्रसाद सौजन्य-पल्लवी राणे, नितीन राणे, हळवल- रामदासवाडी                                              सर्व सोहळ्यास सर्व ग्रामस्थ, भाविक बंधू भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी सह  उपस्थित राहून श्रीराम दर्शन व तिर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवल) यांच्यावतीने करण्यात आली आहे.
error: Content is protected !!