सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बनावट सह्याप्रकरणी संशयित आरोपींना तात्काळ अटक करा!

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे मध्ये बनावट सह्यांच्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून, हे आरोपी मोकाट फिरत आहेत. यामुळे त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात असून, त्यामध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४), ३३६(२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) तसेच कलम ३(५) अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांचा समावेश आहे.. परंतु, तक्रार नोंदवून अनेक दिवस उलटूनही संबंधित गुन्हेगारांना अ‌द्याप अटक करण्यात आलेली नाही. गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत असून, पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून न्याय मिळू शकेल आणि जिल्हा परिषद परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल.

error: Content is protected !!