हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीला जि प अध्यक्ष-उपाध्यक्षांची भेट

ग्रामपंचायत मधील विकास कामांचा घेतला आढावा

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकुन होतो, परंतु प्रत्यक्षात आज या ग्रामपंचायतीचे कामकाज पाहीले आणि समाधान वाटले, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले. अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी हुमरमळा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे आणि सरपंच श्री. अमृत देसाई यांनी गुलाब रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.
हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकुन होतो, परंतु आज प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला भेट देण्याचा योग आला ग्रामपंचायत इमारत आणि विकासकामांचा आढावा घेता या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे असे गौरवोद्गार श्री. कामत यांनी काढले.
या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेकडे योजना आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना योजनांचा फायदा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दादा साईल यांनी ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांना दिल्या. यावेळी ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे विशेष आभार मानले.

error: Content is protected !!