समाजातील गरजूंच्या चेहर्‍यावर हास्य फुलवणे, हीच खरी श्री स्वामी समर्थांची सेवा…….. अंकिता पांचाळ, विश्वस्त, प्रज्ञापुरी श्री.स्वामी समर्थ रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट

श्री स्वामी समर्थ मठाकडून समर्थ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची देणगी

मुंबई जोगेश्वरी येथील प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जीवन आनंद संस्था संचालित विरार फाटा-वरठा पाडा येथील समर्थ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची देणगी दिली.

  धार्मिक आणि सामाजिक कार्याचा समन्वय साधणाऱ्या या संस्थेने गरजू, निराधार आणि वंचित घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून समर्थ आश्रमातील रहिवाशांसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

    यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त अंकिता पांचाळ यांनी सांगितले की, "हे कार्य म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने लाभलेले सेवाभाग्य आहे. समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी स्वामी सेवा आहे."

  जीवन आनंद संस्थेच्या वतीने प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टचे या मदतकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले असून, अशा सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे निराधार आणि वंचित व्यक्तींना मोठा आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले.

  यावेळी प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ  अँड चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री.अ‍निमेश जोशी, सौ.अंकिता पांचाळ, सौ. सिद्धीका अनभवणे, श्री.महेश शेलार, श्री.वैभव माळुंजकर यांच्यासह अक्षता बावलेकर, अभिषेक बावलेकर, अनिष पांचाळ, स्नेहल घोसाळकर , सुवर्णा चौघुले ,पूजा मुंडेकर , अर्चना जोशी ,मनाली कदम ,प्रेरणा मुंडेकर,श्रेयस मांगले , हर्षदा मुंडेकर, वैभवी तरांगे, विवेक तरांगे इत्यादी जण उपस्थित होते.

    यावेळी समर्थ आश्रमाचे भाईदास माळी, दीपक अडसुळे, दिपाली मेघा+माळी, हेमलता पवार हे उपस्थित होते.
error: Content is protected !!