गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघकडून सदिच्छा भेट

मालवण पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी वर्ग १ परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका कार्यकारिणीने स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री हनुमंत गणेश प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्यां समस्यां विषयी चर्चा करुन सहकार्य करण्याची विनंती केली. मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.सिंधुदुर्ग यांचेकडील जावक क्रमांक ४५४ तारीख २७-०५-२०२६ च्या पत्राकडे लक्ष वेधून त्याची अंमलबजावणी तालुका पातळीवरुन त्वरीत करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी सदस्य ए.एन्.ओटवणेकर , एस्.टी.गावडे, पी.टी.पेडणेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!