कणकवली नगरपंचायत च्या बजेट वर विरोधी नगरसेवकांकडून जोरदार आक्षेप

संदेश पारकर, बंडू हर्णे मध्ये रंगले वाक् युद्ध

कणकवली पर्यटन महोत्सवासाठी 10 लाखाची तरतूद

विरोधी नगरसेवकांकडून पर्यटन महोत्सवाच्या तरतुदीसाठी जोरदार आक्षेप

तब्बल दीड तासाहून अधिक काळ सुरू आहे बजेटची बैठक

कणकवली नगरपंचायत च्या आज झालेल्या बजेटच्या बैठकीत नगराध्यक्ष संदेश पारकर आणि विरोधी स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांच्यामध्ये रंगलेल्या शाब्दिक वाक् युद्धाने आजची बजेटची सभा गाजली. यामध्ये बंडू हर्णे यांनी सभेच्या सुरुवातीला लेखापाल यांनी मांडलेल्या बजेटच्या अनेक मुद्द्यांवर जोरदार आक्षेप घेतला. एकूण नगरसेवकांपैकी 10 नगरसेवक हे नवीन असताना घाई गडबडीमध्ये सभा आयोजित करण्यात आल्याचा आक्षेप हर्णे यांनी घेतला. तर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी एक वेळेस त्यांना समजावून घ्या अशी विनंती सभागृहाला केली. नगराध्यक्ष संदेश पारकर व बंडू हर्णे यांच्यातील वाक् युद्ध सभेत सुरुवातीपासून सुरू होते. नगरसेविका आर्या राणे यांनी वृक्ष कर आणि शिक्षण कर कुठे खर्च करता असा सवाल केला. यावेळी कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवा करता दहा लाख रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. मात्र त्याला नगरसेवक मेघा गांगण बंडू हर्णे सुप्रिया नलावडे यांनी आक्षेप घेतला. जर लोक वर्गणी करता दहा टक्के रक्कम तुम्हाला भरताना नगरपंचायतीची स्थिती नाही असे वाटत असेल तर तुम्ही एवढा जनतेचा पैसा का उधळता? असा अहवाल हर्णे यांनी केला. तर सुप्रिया नलावडे यांनी मागील पाच वर्षांमध्ये असा निधी खर्च केलेला बजेटमध्ये दिसून येत नाही. असा मुद्दा उपस्थित केला. मात्र जनतेच्या सोयीसाठी पर्यटन महोत्सव करतो. तुम्ही दहा लाख रुपये आणून द्या नगरपंचायत च्या पैशाला हात लावत नाही. तसेच दहा टक्के लोक वर्गणी भरण्यासाठी विकास कामांकरता नगरपंचायत कमी पडणार नाही. असे संदेश पारकर यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्या खडाजंगी झाली. मात्र विरोधक नगरसेवकांची खर्च तरतूद न करण्याची मागणी पारकर यांनी फेटाळून लावत दहा लाखाची तरतूद केली. यावेळी बंडू हर्णे यांनी तुम्ही तर शासनाकडून 200 कोटीची आणणार मग 10 लाख नगरपंचायतचे का खर्च करता? असा सवाल केला. मात्र पारकर यांनी डिसेंबर किंवा एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव करणार असल्याचे सांगत सदरची मागणी फेटाळून लावली. यावेळी श्री पारकर यांनी केलेले बोटिंग प्रकल्प व पर्यटन केंद्र बंद पडले आरोप हर्णे यांनी केला. तर हे प्रकल्प लवकरच सुरू केले जातील व तुम्ही सुरू केलेला धबधबा देखील बंद पडला जाणार नाही असे पारकर यांनी सांगितले. बैठकीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या प्रसंगी उगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासहित नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळू पारकर, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, बंडू हर्णे, राकेश राणे, संजय कामतेकर, स्वप्निल राणे, मेघा गांगण, मेघा सावंत, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!