कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कणकवली नगरपंचायत, कणकवली, DAYNULM, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली यांच्या वतीने CLF कार्यालय येथे छत्रपतींच्या प्रतिमेस नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, गुणकौशल्य, संघटन याच्यातूने निर्माण झालेले हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याची माहिती नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी दिली. महाराजांच शौर्य, संघटनकौशल्य, प्रजाहितदक्ष राज्यकारभार आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, सत्यजित उर्फ बाळू पारकर, प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, प्रशांत राणे,सतीश कांबळे, अमोल भोगले, संदीप मुसळे, कनकसिंधु शहर स्तर संघाच्या अध्यक्ष प्रिया सरूडकर, दिव्या साळगावकर,मयुरी सरगले सुचिता पालव, स्वाती राणे, रंजिता परब,स्वाती गोखले,ईशा कांबळे,विशाखा कांबळे, ज्योती रावराणे, नीलम कोरगावकर, CLC व्यवस्थापिका सिद्धी नलावडे इतर वस्ती स्तर संघ पदाधिकारी, बचत गट महिला व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर बचत गटातील महिला कडून विविध संस्कृती कार्यक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये महाराजच पाळणा, समूह नृत्य, भाषणे तसेच मयुरी सरगले यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज याची वेशभूषा व एकपात्री ही या कार्यक्रमच विशेष आकर्षण होत.





