महापुरुष मित्रमंडळाच्या पाककला स्पर्धेत पौर्णिमा मांगले प्रथम

महापुरुष मित्र मंडळाचा उपक्रम स्तुत्य

अशोक करंबेळकर यांचे कौतुकोद्गार

शहरातील श्री देव महापुरुष मंदिर यांच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुष मित्रमंडळ यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी विशेष कौतुक करत हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. करंबेळकर म्हणाले,पाककला स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कौशल्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही अत्यंत चांगली बाब आहे. सहभागी स्पर्धकांनी जीव ओतून तयार केलेल्या पाककृतींपैकी कोणत्या पदार्थाला क्रमांक द्यायचा, हे परीक्षकांसाठी मोठे कसबाचे काम आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक वसुधा माने यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका सुमेधा अंधारी, अ‍ॅड. चैताली मुंज, वैशाली काणेकर, शीतल सापळे, मनीषा सापळे, शिल्पा मानकर, स्नेहा अंधारी, प्रीती कोरगावकर, दीप्ती उचले, सौ. मांगले, तृप्ती सापळे, किरण पारकर, साक्षी अंधारी, माधवी घेवारी, सानवी अंधारी, दूर्वा मानकर, सावी अंधारी, सिद्धी वाळके, सिमरन बजाजी, देविका चव्हाण, अक्षता उचले-शेटे, आरती सावंत आदी उपस्थित होत्या.
स्पर्धेत एकूण ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये पौर्णिमा मांगले यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला. शिल्पा मानकर यांनी द्वितीय, तर सोनाली पारकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक तृप्ती मुंज, लक्ष्मी मेनकुदळे, सुलभा वाळके व स्वाती पोरे यांनी प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण वसुधा माने यांनी केले असून सूत्रसंचालन अ‍ॅड. चैताली मुंज यांनी केले.
दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, राजा राजाध्यक्ष, ज्येष्ठ व्यापारी विजय पारकर व बाळा सापळे यांनी स्पर्धेला भेट देत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माप पुरुष मित्र मंडळाच्या महिला वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
या पाककला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. २२ रोजी महापुरुष मित्रमंडळाच्या मुख्य कार्यक्रमात संपन्न होणार आहे.

error: Content is protected !!