लिंगेश्वर मंडळाच्या युवकांची एकी हीच खरी ताकद

पालकमंत्री नितेश राणेंचे गौरव उद्गार

लिंगेश्वर युवा कला – क्रीडा मंडळ हळवल परबवाडी च्या माध्यमातून कलारंग महोत्सवाचे आयोजन

मागील २१ वर्ष सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या सर्व युवकांची एकी हीच आपली खरी ताकद आहे. असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेय. त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे कौतुक केले.
लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित कै. प्रमोद परब स्मरणार्थ एक तालुका एक संघ या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेय. या स्पर्धेचा शुभारंभ हळवल सरपंच अपर्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, उपसरपंच प्रभाकर राणे, सुभाष परब, अशोक परब, विजय परब, सुभाष भागोजी परब, डॉ दिलीप घाडी,

error: Content is protected !!