कणकवली शहरातील मसुरकर किनई रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांकडून कारवाई

सुमारे साडेचार हजाराची दंडात्मक कारवाई
पुन्हा वाहने पार्किंग केलेली आढळल्यास कडक कारवाई करणार
कणकवली शहरातील मसुरकर किनई रस्त्यावर गेले काही दिवस सातत्याने वाहने पार्किंग करून ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच कोकण नाऊ चॅनल च्या माध्यमातून वृत्त प्रसारित केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आज या रस्त्यावरती वाहने पार्किंग करून ठेवण्यात आलेली आढळल्याने कणकवली वाहतूक पोलिसांनी काही वाहन चालकांवर सुमारे साडेचार हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तसेच या ठिकाणी काही हजर असलेल्या वाहन चालकांना समज देऊन सोडण्यात आले. या रस्त्यावर यापुढे वाहने पार्किंग करून ठेवल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील पोलिसांनी याप्रसंगी दिला. वाहतूक पोलीस दिलीप पाटील, संदेश आबिटकर, भास्कर पाटील आदींनी ही कारवाई केली.






