चिंदर येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न आचरा

ग्रामपंचायत चिंदर येथे आपत्ती व्यवस्थापन सिंधुदुर्ग जिल्हा यांचे वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा चिंदर येथे संपन्न झाली. यावेळी एन. डी. आर एफ पुणे चे अधि श्री नरेंद्र सिंग चव्हाण श्री ऋषभ शर्मा श्री निखिल गावडे चिंदर प्रशासक स्वरा पालकर माजी उपसरपंच महेंद्र मांजरेकर ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव पंचायत समिती मालवण विस्तार अधिकारी आत्माराम परब लक्ष्मण हांडे कृषी अधिकारी सौ धामापूरकर आचरा ग्राम विकास अधि श्री कासले चिंदर आचरा हडी बांदिवडे येथील ग्रा सदस्य पोलीस पाटील आरोग्य सेविका आशा ताई शिक्षक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व एन डी आर एफ पुणे चे पथक उपस्थित होते. यावेळी एन डी आर एफ पुणे यांचे कडून उपस्थितांना अचानक लागलेली आग रस्ते अपघात हृदयविकारा संदर्भात सीपीआर देणे खाताना घशात अडकणे टाकाऊ वस्तु पासून जीवरक्षक साहित्य बनवणे आधी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र मांजरेकर यांनी केले…






