सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नाधवडे येथील 28 एकर जागेमध्ये एमआयडीसी ला मंजुरी द्या!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगारा करिता पालकमंत्री नितेश राणे यांची राज्याच्या उद्योग मंत्र्यांकडे मागणी
उद्योग मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे शासकीय मालकीची २८ एकर उपलब्ध जमीन औद्योगिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सदर परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापन झाल्यास जिलाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत वैभववाडी येथील भाजपा पदाधिकारी बंड्या मांजरेकर देखील उपस्थित होते. उद्योग मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात श्री राणे यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, कृषी व फलोत्पादन क्षेत्रात प्रगत असला तरी औद्योगिक ‘विकासाच्या दृष्टीने अजूनही मोठी क्षमता आहे. नाधवडे परिसरातील उपलव्ध शासकीय जमीन, दळणवळणाच्या सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता विचारात घेता या विकाणी नवीन एमआयडीसी विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल तसेच जिल्ह्यातील स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने, मौजे नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मागचे उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.






