आचरा मिराशीवाडी ग्रामस्थांनी केली श्रमदानातून रस्त्या सफाई

सलग तीस-यावर्षीही श्रमदानातून दिला आदर्श

रस्त्यावर आलेल्या वेली आणि झुडपांनी वाहतूकीस होणारा अडथळा,झुडपांमध्ये हरवलेल्या विद्यूत तारा यामुळे होणारा त्रास याबाबत मिराशी वाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत शुक्रवारी श्रमदानातून रस्ता सफाई करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. आचरा मिराशीवाडी येथून जाणाऱ्या आचरा बंदर ,मालवण रस्त्याला जोडणा-या रस्त्यावरुन नेहमीच वर्दळ असते.या रस्त्यावरूनच आचरा बंदरकडे जाणारी एसटी वाहतूक सुरू आहे.त्यामुळे रस्त्यावर वाढलेल्या झुडूप वेलींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.सदर समस्या लक्षात येताच उपसरपंच संतोष मिराशी यांनी पुढाकार घेत वाडीतील शंकर मिराशी सुनील मिराशी,रुपेश बागवे, ओंकार मिराशी,यश मिराशी,विनित मिराशी, रोहित मिराशी,राम मिराशी, दर्शन मिराशी,अमोद मिराशी, दर्शन चव्हाण,विजय लाड, योगेश मिराशी,मंदार कांबळी, कृष्णा मिराशी,मयुर मिराशी, दर्शन चव्हाण आदींना सोबत घेत श्रमदानातून रस्ता स्वच्छ केला. सलग तीस-या वर्षी ही स्वच्छता मोहीम राबवून मिराशी वाडी ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला आहे.

error: Content is protected !!