‘ती’ १४१ गुंठे गमावल्याप्रकरणी संध्या तेरसे यांचे उपोषण

‘औंधकर हटाव’च्या घोषणांनी परिसर दणाणला

सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिकांचा उपोषणाला पाठिंबा

कुडाळ नगर पंचायत हद्दीतील हिंदू कॉलनीतील १४१ गुंठे जमीन नगर पंचायतच्या मुख्यधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मूळ मालक आणि कुळ यांच्या ताब्यात गेली आहे. हे नगर पंचायतचे आणि पर्यायाने कुडाळवासीयांचे नुकसान आहे. त्यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी या मागणीसाठी नगरसेविका संध्या तेरसे यांनी आज कुडाळ नगर पंचायत समोर लाक्षणिक उपोषण केले. त्यांना नगर पंचायतच्या विरोधी नगरसेवकांसह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दहा दिवसानंतर येथेच मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संध्या तेरसे यांनी दिला आहे.
हिंदू कॉलनीतील ‘त्या’ १४१ गुंठे जमिनीबाबत आज नगरसेविका संध्या तेरसे यांनी आज नगर पंचायत समिती समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. सकाळी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी इतर नगरसेवक आणि नागरिक त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी उपोषणकर्त्यानी ‘कुडाळ एकजुटीचा विजय असो’, ‘औंधकर हटाव कुडाळ शहर बचाव’, ‘१४१ गुंठे जागा मिळालीच पाहिजे’ अशा घोषणांनी नगर पंचायत परिसर दणाणून सोडला.
यावेळी संध्या तेरसे म्हणाल्या, बिनशेती प्लॉटिंग झाल्यानंतर. प्लॉटिंगच्या १० टक्के जमीन संबंधित शासकीय यंत्रणेच्या नावे लागते. तशी हिंदू कॉलनीतील १४१ गुंठे जमीन त्यावेळच्या सरपंच ग्राम पंचायत याच्या नावे लागली. त्यातील ३७ गुंठे जमिनीवर कुळ असल्याचा दावा करण्यात आला. त्याबाबत न्यायालयात केस चाललं आणि २०२४ ला निकाल नगर पंचायतच्या विरोधात लागला. पण याबाबत नगर पंचायतचे जे विश्वस्त मानले जातात त्या नगरसेवकांना याची कोणतीच कल्पना मुख्याधिकाऱ्यानी दिली नाही, कि पुढे ती जागा मिळविण्यासाठी वरच्या कोर्टात गेले नाहीत. त्या जगत कुडाळच्या नळ पाणी पुरवठा योजनेची साडेतीन लाख क्षमतेची दीड कोटी रुपये खर्च करून टाकी बांधण्यात आली आहे. ती जागा आता कुळाच्या नावे लागण्यात आल्याने पाण्यापासून कुडाळ शहर वंशीय वंचित झाले आहेत. या साऱ्याला कुडाळचे मुख्याधिकारी विनायक औंधकर हे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे काही कुडाळ नगर पंचायतचे नुकसान झाले आहे ते त्यांच्याकडून भरून घ्यावे अशी मागणी संध्या तेरसे यांनी केली आहे. याबाबतचे सर्व नगरसेवक आणि नागरिक यांच्या सहीचे पत्र त्यानी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
याबाबत प्रशासनाचा कोणीही अधिकारी आगर कर्मचारी भेटीला आला नसल्याचे संध्या तेरसे यांनी सांगितले. आजचे हे लाक्षणिक उपोषण असून आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दहा दिवसानंतर येथेच मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संध्या तेरसे यांनी दिला आहे.
या उपोषणाला विरोधी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ शहराचा विचार करून पाठिंबा दिल्याचे सांगितले. तर बरेच नागरिक देखील या उपोषणात सहभागी झाले होते. त्यांनी देखील संध्या तेरसे यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, आफरीन करोल, अक्षता खटावकर, जि प सदस्य आरती पाटील, तसंच नगरसेवक आणि गटनेते विलास कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, सई काळप, श्रेया गवंडे, ऍड. राजीव कुडाळकर, विरोधी नगरसेवक मंद शिरसाट, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, राजू राऊळ, संजय बोभाटे, राकेश कांदे, प्रसाद तेरसे, संजय आठल्ये, उमेश नाडकर्णी, नितीश म्हाडेश्वर, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!