कोकणवासीयांना दिलासा; एका दिवसात प्रश्न मार्गी लावल्याबद्दल देवाभाऊ, रवीदादा आणि विशेष नितेशजी राणे यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मानले आभार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या तात्काळ हस्तक्षेपाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

कोकणातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर केले. याचबरोबर मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांनाही निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

या निवेदनाची तात्काळ दखल घेत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संबंधित यंत्रणांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्यात ऑनलाइन आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रशासन तातडीने कामाला लागले असून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत.

जनतेच्या प्रश्नांसाठी केलेल्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समाधान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब आणि विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!