कणकवली उपतालुका प्रमुख पदी सचिन लोके , कळसुली उपविभाग प्रमुख पदी नंदकिशोर परब यांची नियुक्ती

शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी केले अभिनंदन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नांदगाव पंचायत समिती उपविभाग प्रमुखपदी श्री. सुरेश सुतार, कासार्डे विभागाच्या उपतालुका प्रमुखपदी श्री. सचिन लोके आणि कळसुली पंचायत समिती उपविभाग प्रमुखपदी श्री. नंदकिशोर ज्ञानदेव परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक आणि विधानसभा प्रमुख तथा कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेवक संकेत नाईक,तालुकाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके,माधवी दळवी,शोभा हुले, बबली राणे, बाळा राऊत, मज्जित बटवाले, संदीप कदम, चेतन हुले, तात्या निकम, रवींद्र खंदारे, विलास गुडेकर, ताम्हाणेकर, गुरु पेडणेकर,सुरेश मेस्त्री, नंदकिशोर परब, रोहिणी पिळणकर, दिव्या साळगावकर, राजू राणे,
रोहित राणे, निलेश सावंत, संतोष गुरव, राजा म्हसकर, विठोबा हुले आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!