खा. नारायण राणे यांनी एस.टी. सावंत यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती , मराठा समाजाचे नेते एस.टी.सावंत यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या जाणवली येथील निवासस्थानी खा. नारायण राणे यांनी भेट देत सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खा. राणे यांनी कुटुंबियांची विचारपूस करत एस.टी.सावंत यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक निष्ठावंत , प्रामाणिक सहकारी होते , अशी भावना व्यक्त केली.
यावेळी संजय सावंत, मनोज सावंत, संदेश सावंत, संदीप सावंत, जि.प. माजी उपाध्यक्ष रंजन राणे ,सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, भगवान दळवी , तिवरे सरपंच भाई आंबेलकर, दिलीप राणे, नितीन राणे, प्रशांत राणे, राजन परब, दिलीप राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!